उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डॉ. चंद्रतेज कदम यांची कामगिरी
नाशिक (प्रतिनिधी) :
उत्तर महाराष्ट्रातील नामवंत नामको हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांत ५० एण्डोस्कोपिक स्पाईन सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे त्यातील दोन रुग्णांवर सर्व्हायकल स्पाँडिलिसीस आजारावरदेखील एण्डोस्कोपीद्वारे सर्जरी करण्यात आली. रुग्णालयातील एण्डोस्कोपिक स्पाईन सर्जन डॉ. चंद्रतेज कदम यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत ही उच्च तंत्रज्ञानाधारित उपचारपद्धती उत्तर महाराष्ट्रात प्रथमच उपलब्ध करून दिल्याची माहिती रुग्णालयाचे सचिव शशिकांत पारख यांनी सोमवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत दिली.
गरीब, गरजू लाभाथ्र्यांसाठी मोफत तर, अन्य रुग्णांसाठी माफक दरात होत असलेल्या या पद्धतीच्या शस्त्रक्रियेची माहिती सर्वदूर पोहोचावी, या उद्देशाने नामको हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण कोरियामधून एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीची
उच्च तंत्रज्ञानामुळे सुरक्षित व जलद शस्त्रक्रिया
पारंपरिक पद्धतीने पाठ व मणक्यावरील शस्त्रक्रिया करताना मोठा चीरा, स्नायू वा हाडे कापण्याची गरज आणि रक्तस्त्राव यामुळे रुग्णालयात पाच दिवसांपर्यंत थांबावे लागते. मात्र, एण्डोस्कोपिक सर्जरीमुळे केवळ लहान छेद देऊन अत्यंत कमी त्रासदायक प्रक्रियेतून शस्त्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर रुग्णांना काही तासांतच डिस्चार्ज मिळतो. या पद्धतीद्वारे डॉ. कदम यांनी अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या सी-३, सी-४, सी-५ आणि सी-६ या सर्व्हायकल व्हर्टिब्राचीही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. विशेष म्हणजे यात ८३ आणि ८४ वयाच्या वृद्ध रुग्णांसह एका २७ वर्षांच्या तरुणालादेखील त्यांनी व्याधीमुक्त केले आहे.
फेलोशिप, एम. सी. एच. न्यूरोसर्जरीचे शिक्षण डॉ. दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटल येथून पूर्ण केलेल्या डॉ. कदम यांना उल्लेखनीय वैद्यकीय सेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष रवींद्र गोठी, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ.
विशाखा जहागिरदार, सीईओ डॉ. लक्ष्मीकांत पाठक, जनरल मॅनेजर (अॅडमिन) समीर तुळजापूरकर, न्युरो फिजिओथेरपीस्ट डॉ. पुष्पक पाटील आदी उपस्थित होते.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको मानदुखी, पाठदुखी, हातापायाला मुंग्या येणे, हाताची पकड सैल होणे,
लवकरच न्युरो रिहॅब सेंटरसह मेडिकल कॉलेजची उभारणी नामको हॉस्पिटलमध्ये लवकरच न्युरो रिहॅब सेंटरची उभारणी केली जाणार असल्याची माहिती सचिव शशिकांत पारख यांनी दिली. तसेच, संस्थेचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयदेखील उभारले जाणार आहे. त्यासाठी मुंबईचे दानदाते तथा प्रसिद्ध उद्योजक सुभाष रुणवाल यांनी या महाविद्यालयासाठी संपूर्ण आर्थिक मदत देण्याची ग्वाहीदेखील दिल्याचे पारख यांनी सांगितले.
थोडे चालल्यानंतर लगेच बसावेसे वाटणे, आजार गंभीर असेल तर तोल जाणे अशी लक्षणे आढळल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. रुग्णांनी दुखणे अंगावर न काढता वेळेत निदान करून उपचार घ्यावेत, जेणेकरून शस्त्रक्रियेची वेळ येणार नाही
@endoscopic_____neurospinesurgeon @namco_hospital