+918043694628
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
नामको हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांत ५० एण्डोस्कोपिक स्पाईन सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे त्यातील दोन रुग्णांवर सर्व्हायकल स्पाँडिलिसीस आजारावरदेखील एण्डोस्कोपीद्वारे सर्जरी केली गेली. रुग्णालयातील एण्डोस्कोपिक स्पाईन सर्जन डॉ. चंद्रतेज कदम यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत ही उच्च तंत्रज्ञानाधारित उपचारपद्धती उत्तर महाराष्ट्रात प्रथमच उपलब्ध करून दिल्याची माहिती रुग्णालयाचे सचिव शशिकांत पारख यांनी सोमवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत दिली. दक्षिण कोरियामधून एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीची फेलोशिप, एम.सी.एच. न्यूरोसर्जरीचे शिक्षण डॉ. दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटल येथून पूर्ण केलेल्या डॉ. कदम यांना उल्लेखनीय वैद्यकीय सेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष तरुणांनो, वेळीच सावध व्हा, लक्षणांकडे । डिजिटल युगातील बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, मोबाईल व संगणकाचा अतिवापर आणि चुकीच्या बसण्याच्या सवयींमुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास आता ३०-४० वयोगटातील तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पूर्वी ज्यांना ५०-६० वयानंतर याची बाधा होत होती, त्याच समस्यांचा आता तरुण पिढीला सामना करावा लागत आहे. रवींद्र गोठी, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. विशाखा जहागिरदार, सीईओ डॉ. लक्ष्मीकांत पाठक, जनरल मॅनेजर (ॲडमिन) समीर तुळजापूरकर, न्युरो फिजिओथेरपीस्ट डॉ. पुष्पक पाटील आदी उपस्थित होते. न्युरो रिहॅब सेंटरसह मेडिकल : नामको हॉस्पिटलमध्ये कॉलेज लवकरच न्युरो रिहॅब सेंटरची उभारणी केली जाणार असल्याचे सचिव पारख यांनी सांगितले. तसेच, संस्थेचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयदेखील उभारले जाणार आहे. त्यासाठी मुंबईचे दानदाते तथा प्रसिद्ध उद्योजक सुभाष रुणवाल यांनी त्यासाठी आर्थिक मदतीची ग्वाही दिल्याचे पारख यांनी सांगितले.